STORYMIRROR

Deepali Mathane

Classics

4  

Deepali Mathane

Classics

अभंग रचना:-८-८-८-७ दयाघना तु कृपासिंधू

अभंग रचना:-८-८-८-७ दयाघना तु कृपासिंधू

1 min
252

अनाथांचा तुच नाथ 

असावी तुझीच साथ

जोडूनीया दोन्ही हात

तुझ्या पुढे दयाळा।।1।।


माझे एकचि मागणे

तुझ्या नामात राहणे

आशिष तुझा असणे

सर्वांच्याच पाठीशी।।2।।


आनंदघन माझिया

कृपासिंधु तूं माझिया

दर्शनानेच तुझिया

पावन मी जाहलो।।3।।


अवतारी पुरुष तूं

जगा दावण्या दिशा तूं

दुःखीजनांचा भार तूं

घेतला तुझ्या शिरी।।4।।


समर्थ वाणी जगास

लावूनी भक्तीपंथास

दुःख गेले विलयास

कृपेने दयाघना।।5।।


प्रसाद हाच भक्तीचा

पावन नीतिमत्तेचा

तुझ्या अगाध सत्तेचा

पावलासे आम्हासी।।6।।


घडावी तुझीच सेवा

हेचरे देवा

तुझ्याच भक्तीचा मेवा

मिळो सदा आम्हासी।।7।।


संकटात माझी धाव

तुझ्याकडेच आर्जव

ये धावूनिया तू पाव

हाकेवरती मज।।8।।


तुझ्या चरणीं अर्पण

माझे पूर्ण समर्पण

असे हे कृतार्थपण

असू द्यावे आजन्म।।9।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics