अभंग आयुष्याचा
अभंग आयुष्याचा
विचारांचे धन | साठवावे मनी |
आठवावे ध्यानी |जन्मांतरी ||
मुखी देवाजीचे |घ्यावे सदा नाव |
मनी भक्तीभाव |ठेवोनिया ||
आईविन नाही |मायेला पाझर |
जग हे परके |आईविना ||
नातं हे मैत्रीचे |आठवांचा गाव |
नसे दुजाभाव |मनोमनी ||
संसाराचा गाडा |दोघांनी हाकावा |
पूर्णत्वास न्यावा |जन्मोजन्मी ||
होऊनी सबळ |आयुष्य उदंड |
चालावे अखंड |भूमंडळी ||
पांग समाजाचे |रहावे फेडत |
दृष्टांशी झुंजत |सदोदित ||