STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

आयुष्याच्या त्या अवघड वळणावर .

आयुष्याच्या त्या अवघड वळणावर .

1 min
14.6K


आयुष्याच्या त्या अवघड वळणावर ...

तू येऊन गेलीस दुःखावरती फुंकर बनून

जाणते - अजाणतेपणाने तू बघ ...

आनंदी जगणे मज तू शिकवून गेलीस


माझ्या लेखी तू कोण ? आलीस का ?

अर्थ नव्हता फुजुल त्या प्रश्नांना ...

तू आलीस घरभर दरवळलीस तेच पुरेसे

तूच म्हणालीस प्रेमाची ऊब असावी नात्याला ...


थांब म्हणावया अर्थच नव्हता तेंव्हा...

कंठ दाटला असता नसे वाट मोकळी शब्दांना...

नेहमीच तू गं मनातलं सारं ओळखणारी...

अशी कशी गं तू ऐनवेळी सोयीस्कर विसरलीस


तुझंही खरंच आहे म्हणा, बुडत्या नावेचा आसरा ...

नि शापित आयुष्याचा वारसा तरी तू का म्हणून चालवावा ?

झाले गेले विसरून जा गं, सुखी राहा, नांदा सौख्यभरे ....

पूर्ण व्हावी तुझी मनोकामना ईश्वरचरणी हीच प्रार्थना ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance