STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

4  

गीता केदारे

Inspirational

आयुष्याच्या पायरीवर...

आयुष्याच्या पायरीवर...

1 min
3.2K

आयुष्याच्या पायरीवर... 


काळाच्या या भोवऱ्यात

हरवलं माझं बालपण

आयुष्याच्या पायरीवर

लाभलं आता म्हातारपण...


किती होता काळ सुखाचा

आठवणी बालपणीच्या

जाग्या झाल्या गोष्टी काही

खोडकर तरूणपणीच्या...


फिरायचो लहानपणी घालून 

पायात पॅक पॅक वाजणारे बूट

आली आता हातात काठी

जातोय तोल अन् गेले सुटबूट


आता दिला कितीही

आवाज त्या दिवसांना 

 नाही मिळणार बालपण तरुणाई 

 वार्धक्य हे जगताना... 

 

  तरीही राहावे प्रत्येकाने चिरतरुण 

  जपावे आपले किशोरवय 

 रमावे म्हातारपणी नातवंडांसवे

 येईल मग आपल्या बालपणीची सय.. 


दैवकृपेने लाभलेल्या जन्माचे 

 शतशः आभार मानावे 

 म्हातारपणी सर्व आठवणींना 

 आईच्या मायेने गोंजरावे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational