आयुष्याची परीक्षा..
आयुष्याची परीक्षा..
आयुष्याची परीक्षा सोपी नसते राव
रोजच बदलत असतात तिचे हावभाव
शाळेत पेेपर लिहण्याची ती परिक्षा परवडली
आयुष्यातील परीक्षेची माणसाची पुरती वाट लावली
रोजच नवे पेेपर रोजच नवे विषय
गणितातील सोपेे वाटत होते सारेे कोन
आयुष्यातील परीक्षेत सांगा कुठवर टिकणार कोण
मराठी व्याकरणातील पाठ होऊन जायचा अलंकार यमक
आयुष्यातील परिक्षेत सरणावर जाईपर्यंत माणसाला कळत नाही जगण्याचा गमक
इंंग्लिशमधले मार्क वाढायचे अनसीन पॅॅसेजमुळे
आयुष्याचा पेेपर सोडवताना माणसं होवून जातात खुळे
विज्ञानाच्या प्रयोगशाळेत परवडली ती चंंचुपात्र
नेेहमीच विचार येेतो आयुष्यातील परिक्षेत
एकाच माणसाने निभवावी कशी इतकी सारी पात्रं
शिकलो भूगोलात सूर्य पृथ्वीभोवती फिरतो
बारा तास दिवस आणि बारा तास रात्री
आयुष्यातील परीक्षेत टिकण्यासाठी कष्ट करावे लागतात
अहोरात्र आयुष्याच्या परीक्षेत सांगा माणसाने पास व्हायचे कसे
कधी मार्च कधी ऑक्टोबर तर कधी एटीकेटीचे चालत नाही इथे फासे
म्हणून वाटते आयुष्याची परीक्षा सोपी नसते
रोजच बदलतात विषय, पेपर माणसं आणि
तयांच्या वागण्यातील हावभाव..
