आयुष्याचा रंगमंच
आयुष्याचा रंगमंच
कधी हसवी कधी रडवी
आयुष्याचा रंगमंच जगणे शिकवी
रंग आयुष्याचे दाखवी
जगण्यची नवी उमेद मनी जागवी
बालपण ते रम्य निरागस
तारुण्यात असे जोश
म्हातारपण आठवतो सारंश
आयुष्याचा रंगमंचात येतात भुमिका खास
येथे असते जगतांना कसरत भारी
ठेवावी लागते कर्तव्य पार करतांना तयारी
येथेच शिकायला मिळते दुनियादारी
आयुष्याच्या रंगमंचाची असे दुनिया न्यारी
या रंगमंचावर कधी हसतांना रडावे
कधी अश्रू लपवून हास्य चेहर्यावर ठेवावे
खरे,खोटे विषाचे घोट पित जगावे
भूमिकेत आपण आपल्या मनसोक्त रमावे
