STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Inspirational

3  

SANGRAM SALGAR

Inspirational

आयुष्याचा गाडा

आयुष्याचा गाडा

1 min
202

जन्मल्यानंतर सगळ्यांनाच आपलं नवल वाटतं

त्यावेळेस आपल्याला काहीच नको असतं

लहानपणी सगळ्यांना आपण हवहवसं वाटतं

आपल्या निर्मळ मनात फक्त चंचल विचार असतात

काहीतरी हवं असतं

सतत मग्न राहायला

दहा-बारा वयात आपण दुसऱ्यांना ओळखायला लागतो काहीजण जवळ तर काहीजण दुरावलेली असतात

सर्वजणच माध्यमिक शाळेत ज्ञान प्राषन करण्याचा प्रयत्न करतात

सगळं सरळ असल्यामुळे कधी धक्काच बसत नाही

कुणीतरी हव असतं

आपलं सर्व लाड पुरवणारं

महाविद्यालयात आपण खूप आनंद लुटतो

अधूनमधून धक्केही घेत असतो

परिस्थितीची हळूहळू जाणीव होऊ लागती

आयुष्य खूप चटके देत असतं

कोणीतरी हवं असतं

आपल्या आयुष्याचा रथ चालविण्यासाठी

अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण तडफडतो

काहीजण आयुष्याला शिकवतात तर काहीजण त्यालाच संपवतात

हळूहळू जबाबदाऱ्यांचे ओझं येऊ लागतं

त्यावेळेस आपले साथी खूप कमी असतात

कोणीतरी हव असतं

कधी न साथ सोडणार....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational