आयुष्या आभार तुझे
आयुष्या आभार तुझे
आयुष्या आभार तुझे,
शिकवले तू जगावे कसे,
स्वार्थाने बरबटलेल्या जगात,
ठामपणे उभे रहावे कसे.
आयुष्या आभार तुझे,
भेटवलेस अनेक स्नेही,
संगतीने या साऱ्यांच्या,
मागे सरली सारी वेदनाही.
आयुष्या आभार तुझे,
अनुभवाची दिली शिदोरी,
याच शिदोरीच्या जोरावर,
जगण्याची उमेद मिळते खरी.
आयुष्या आभार तुझे,
जग हे सुंदर पहावया मिळाले,
आनंदी जीवनाचे मजला,
आज सूत्र ही कळाले.
**********************
