STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आयुष्य

आयुष्य

1 min
165

आयुष्याचे वरदान

लाभे मानवा भाग्याने

दैवदत्त जन्म मृत्यू

हाती नाही येणे जाणे


प्राक्तनाप्रमाणे जन्म

होई लालनपालन

बाल्य शैशव यौवन

गाडी धावे घाटातून


आयुष्यास दे आकार

मनु स्वतः कर्तृत्वाने

करी विकास वेगाने

यशप्राप्ती प्रयत्नाने 


रस्ता लागे वळणांचा

कधी यश अपयश

वृत्ती खिलाडू ठेवता

मिळे यश कीर्ती त्यास


आयुष्याचा लेखाजोखा

प्रेम मायेचा ओलावा

नातीगोती रेशमाची

गणगोत बंध हवा


असे अस्थिर आयुष्य

असे शेवट अज्ञात 

सुखी रहावे मानसी

मंत्र जपा जीवनात



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract