STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

आयुष्य

आयुष्य

2 mins
315

स्वच्छ निर्मळ पाण्यासारखं 

सह्याद्रीच्या लेण्यासारखं आपल आयुष्य असावं 

सुंदर निरागस मन आणि त्यावर निर्मळ हास्य असावं


कधी घ्याव श्वासात भरून आठवणींच्या जुना गंधांना  

उघडावे जुने अल्बम कधीतरी 

आठवाव त्या सुंदर, रम्य बालपणीच्या दिवसांना  


कधी लहान होऊन ऐकावं बोबड्या बोलांना  

नव्याने पुन्हा जाणावं निरागस त्या डोळ्यांना 

कधी येऊ द्याव जवळ चिवचिवणाऱ्या चिमण्यांना  

जपावं अलगत कधी हृदयातल्या संवेदनांना  


होता आनंद खळखळून हसावं 

भरून आल्यास हृदय कधी मुक्त वाहू द्याव आसवांना


हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा.....जगलो आज आणि उद्या 

हाच दिवस जुना...म्हणूनच

जीवनभर पुरतील अशा कडू -गोड आठवणींना मनाच्या कप्प्यात जपून ठेवावं 

चांगले-वाईट मनाच्या तराजूत तोलावं

 मनाला पटेल, योग्य वाटेल तेच करावं  

आयुष्याच्या मैदानात आत्मविश्वासाची 

ढाल घेऊन शौर्याने लढावं 


आकाशाच्या पंखांना प्रयत्नाचं बळ 

देऊन उत्तुंग यश कधीतरी गाठावं 


 संकटे लाख येतील...ते क्षणिक असतील

 पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरं जावं उमेदीच्या जोरावर संकटावर मात करीत कधी जिंकावं

 आयुष्यभर आपल्यासाठी झिजलेल्या त्या आई बाबाचं आयुष्य अभिमानाच्या रंगांनी सजवावं

  

कधी उडावे फुलपाखरा सवे वेचित फुलांचे रंग  

 थोड धावावं, थोड थांबाव कधी जिंकाव कधी हरावं 

 यशाची चव चाखावी अपयश ही निरखून बघावं 

 निस्वार्थपणे कार्य करत स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना कधी सुखवावं , 

स्वार्थ, अहंकार, गर्व, गैरसमज या 

सगळ्यांपासून जरा दूरच राहावं  


दुःखातही सुख समाधान मनी बाळगावं 

ओजंळीत आलेल्या सुखाला कधीतरी अलगदपणे गोंजारून पहावं नाही होत कधी सगळं मनासारखं संयमाने चालावं स्वप्नात पाहिलेल्या त्या स्वप्नांना सत्यात कधीतरी उतरून बघावं 

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा 

वर्तमानातल चित्र पूर्ण करावं 

कायम मागण्या करण्यापेक्षा 

कधीतरी काहीतरी देऊन पहावं 

सुख दुख दोन्हींनी भरले हेची आयुष्य पण दुखा विना सुख नसे हेची कटू सत्य 

कधी कोणास कमी, कधी जास्त मिळे आयुष्यात हा खेळ सदैव चाले...आयुष्यातील सुख दुःखाला झेलून बघावं 

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा जिवलगाच्या खांद्यावर कधीतरी रडून पहावं

शिकवण घेवूनी फुलांकडून 

 आनंदात साथ अन् दुःखात मदतीचा हात देवून सुगंधापरी दरवळून नात्यातील ऋणानुबंधाना कधी दृढ करावं 


निरागस बालकाच्या मुग्ध हसण्याला

 खळखळत्या झऱ्याच्या झळझळत्या आनंदाला  

आपल्यामध्ये कधीतरी साठवून बघावं

 नात्यांना बांधून रेशमी धागे सुखाचे 

ह्रदयी वसावी आठवणींची शिंपण 

 होऊनी मुक्तांगण, निस्वार्थपणे भावपूर्ण नातं जपावं  

क्षणी आनंदाच्या सदैव उमलत रहावं येणारया

संकटाला ही समर्थपणे पेलत राहावं  

आयुष्य म्हटले की तडजोड आलीच... 

त्याला तडा जाऊ द्यायचा की जोडायचे 

हे मात्र ज्याच त्याने ठरवावं 

क्षणा क्षणांनी बनत आयुष्य म्हणूनच

आयुष्यात प्रत्येक क्षणी बहरत राहावं हृदयातील प्रत्येक पान उलगडून सप्तरंगाची उधळण करीत आयुष्य मनमुराद जगावं 

आयुष्यात जगणं मरणं एक 

 कोड जाता जाता एवढ सोडून बघावं... हरायच आहेच एक ना एक दिवस मृत्यू कडून, तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्यावं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational