आयुष्य...
आयुष्य...
खरच आयुष्य हे असच असत,
नावाला फक्त ते आपल असत..
जगाव मात्र इतरांच्या मर्जीने असत
आयुष्याची डोर सांभाळण,
इतकं सोपं नसत..
कधी स्मशान शांत,तर कधी,
खळखळत्या पाण्यासारख..
कधी बेरंग, ओसाड तर,कधी
रंगीबेरंगी इंदधनुष्यासारख..
कधीकधी तर आयुष्य एखाद्या,
उनाड पाखरासारख भासत..
तर कधी स्वतभोवतीच ,
गोलगोल फिरत असत..
आयुष्य घडून तर अस, खूप काही जात
त्यात वाईट जास्त अन्
चांगल फार कमी असत..
पण,मागे वळून पाहताना आयुष्यात,
खूप काही राहून गेल्यासारखं वाटत ..
