STORYMIRROR

Vanita Khandare

Inspirational

3  

Vanita Khandare

Inspirational

उसवले धागे.. कधी कसे

उसवले धागे.. कधी कसे

1 min
195

उसवले धागे कधी कसे..  

विचकले ते आता इतके,  

पुन्हा कधीही टाका न घालता येण्यासारखे..  

  

घट्ट विश्वासाच्या धाग्याने,  

होते मी ते विणले..  

पण अहंकाराने टाके उसवतील,  

इतके गेले ते ताणले..  

  

त्या धाग्याची वीण ही,  

ऐकमेकात इतकी होती गुंतली..  

पण नात्यांच्या ओझ्याखाली,  

टचकन गेली उसवली..  

  

निर्जीव ते धागे, तरी  

एकमेकात इतके समावले..  

शेवटी माणसामुळेच निर्जीव धागे  

क्षणात उसवले..  


केवळ माणसाच्या मीपणाने,  

कहर केलाय असा..  

गुंतलेले धागे उसवले,  

का रे..? असा वागलास तु माणसा..  



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational