STORYMIRROR

Vanita Khandare

Romance

3  

Vanita Khandare

Romance

तुझ्यासवे..

तुझ्यासवे..

1 min
160

तुझ्या संगतीने काही,

क्षण जगावे नवे जुने..

आयुष्य सुंदर मानूनी,

सोबती चालावे तुझ्यासवे.. 2


जीवनगाणे गाऊया,

विसरून सारे रुसवे फुगवे..

आनंदाने मला आज,

जगायचे आहे तुझ्यासवे... 2

 

हाती हात तुझ्या गुंफून,

जुने क्षण काही आठवावे.. 

नव्या आठवणी जोडण्यासाठी,

पुन्हा एकदा जगायचे तुझ्या सवे.. 2


नाते आपल्या प्रितीचे,

नेहमी असेच फुलत रहावे..

सुखदुःखाच्या क्षणी मी,

कायम असावे तुझ्यासवे.. 2


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance