STORYMIRROR

Vanita Khandare

Inspirational

3  

Vanita Khandare

Inspirational

फुलपाखरू..

फुलपाखरू..

1 min
126

पिवळ्या रंगाच ते ,

इवलस फुलपाखरू

ज्याच्या मागे,बालपणी

धवायचे मी दुडू- दुडू..

तसे तर फुलपाखराच्या

असे विविध छटा..

पण पिवळ्या फुलपाखरासाठी

तुडवायचे मी अनेक रान वाटा..

क्षणातच जमिनीवर,

तर,फुलाच्या पाकळीवर कधी. .

माझ्या पावलाची चाहूल लागताच,

भुर्रर्रर्कन झेप घेई नभी..

काळाच्या ओघात फुलपाखरू

माझ्यापासून दूर झाल

पण आजही कधी जवळ भिरभिरलं

तर मन प्रफुलित होत..

अन्, बालपणच्या आठवणीत,

मन रममाण होऊन जात. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational