आयुष्य उतारवयाचे
आयुष्य उतारवयाचे
आयुष्याच्या वाटेवर
जीवनाच्या वळणावर
एक एक हात
हळूच निसटून जातो.
राहते फक्त साथ
जीवन साथीची,
ज्यांच्याबरोबर आयुष्यभर
भांडलो, रागावलो त्या संगीनीची
गरज उतारवयात कळते
आणि आयुष्याला वेगळी
कलाटणी मिळते.
आयुष्यभर अहंकार
विनाकारण बाळगला,
उतारवयात त्याची जागा
लाचारी ने घेतली.
प्रेमाची व्याख्या बदलली
आणि काळजी मनात शिरली.
ज्या प्रेमासाठी आयुष्यभर
तरसली ती उतारवयात
मजबुरीत मिळाली.
आयुष्याच्या वाटेवर
नात्यांची सैल
हळूहळू सुटत गेली.
