आयुष्य हे असंही असतं
आयुष्य हे असंही असतं


आयुष्याला सावरावे
आयुष्यात आपल्या काय होतं
अचानकपणे खूप सुख येतं
न मागता सगळं मिळतं
आयुष्य असंही असतं...
आयुष्यात आपल्या काय होतं
अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळतो
एकदम सगळं सुख हिरावून जातं
आयुष्य असंही असतं...
आयुष्यात आपल्या काय होतं
बरेच आपण प्लॅन करतो
जे ठरतं ते कधीच होत नसतं
आयुष्य असंही असतं...
आयुष्यात आपल्या काय होतं
सुख येतं अचानक दुःख येतं
बरोबरच कधीही भरून न निघणाऱ्या जखमा देतं
आयुष्य असंही असतं...