आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक रंगमंच
रडता रडता हसुन घ्यावे
हसता हसता जगुन घ्यावे
आयुष्याच्या या रंगमंचावर
कधी भूमिका आवडणारी
कधी असुदे नावडणारी
तरी चोख बजवावी लागते
आयुष्याच्या या रंगमंचावर
वेगवेगळी वळणं सारी
ठरले नसतात इथे मार्ग
तरीही चालत रहावे लागते
आयुष्याच्या या रंगमंचावर
दुःख लपवुन सारे
सुखच वाटता यावे
कायम पडद्यामागचा नायक बनावे
आयुष्याच्या रंगमंचावर..
आले किती गेले किती
मुखवटे जगाने दाखवले जरी कितीही
आपणही मग उसने हसावे
आयुष्याच्या रंगमंचावर..
जन्मापासून जन्मापर्यंत लागलेला
व्याप हा किती
जगावे किती मरावे किती क्षणभंगुर
या आयुष्याच्या रंगमंचावर!!
