आवड
आवड
पक्षी होऊनी उडावं
कधी खोप्यात दडावं ।
विहर मोकळा असा
जसे घडे ते घडावं ।।धृ।।
चाक फिरे कुंभाराचे
माती बिन आकाराचे
द्यावा आकार साजरा
माठ पाणी ते पिण्याचे ।।१।।
ढोरं वळती रानात
पक्षी ढोराच्या पायात
घोटाळती पायरवं
चोच दाणे ती वेचत ।।२।।
काय असावा संसार
पशु पक्ष्याला आधार
ना राही कधी ते रिकामे
पोट पाणी सरकार ।।३।।
थवाचे थवे आकाशी
हवा पाणी त्यांची काशी
अडते ना कधी तयांचे
खोपा टांगला झाडाशी।।४।।
सुर पाण्याच्या डोहात
खळखळ ती जोरात
या हद् यी ते तरंग
पतंग उडे आकाशात।।५।
