STORYMIRROR

Sandhya (Bhoir)Shinde

Abstract Romance

3  

Sandhya (Bhoir)Shinde

Abstract Romance

आठवते मला

आठवते मला

1 min
232

आठवते अजूनही मला

ती भेट आपली पहिली

बिन थेंबांची बरसात ती

भर उन्हाच्या चांदव्यातली


आठवते अजूनही मला

खुल्या रानातली पायपीट

उनाड अभ्रांच्या आडून

वेड्या सूर्याची उघडमीट


आठवते अजूनही मला

त्या तरुतलाची सावली

प्रीतीच्या गुजगोष्टींनी 

गाली चढलेली ती लाली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract