STORYMIRROR

Vinay Dandale

Abstract Others

4  

Vinay Dandale

Abstract Others

आठवणींची अनुभूती ...!

आठवणींची अनुभूती ...!

1 min
413

आठवणी ह्या संपतच नाहीत 

अधूनमधून स्मरत राहतात 

वारंवार घोंगावत राहतात फुलपाखरे होऊन 

मन:पटलाच्या प्रवेशद्वारावर ....


वादळांच्या तीव्रतेची कमान ताणून 

स्वप्नांचा चुराडा करणारी लाट 

अंतर्मनातील कपारीत विसावू देत नाही 

अंतर्मनातील कल्लोळाला .....


उद्रेकाच्या नव्यानव्या रूपांचे थैमान

आयुष्यच खर्जी पडण्याचा कद्रुपणा 

आता तर सावध होऊनच 

उद्रेकांच्या स्फोटातून जर्जर होण्याच्या काळाला 

थोपवाव लागेल ...


अजून किती बाकी आहेत शिलकीत

अनुभूतींच्या कथा, व्यथा आणि गाथा 

उगवत्याला नमस्कार करून दररोज 

गाठ बांधतोय आयुष्याच्या काखोटीला .... !!!!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract