आठवणी
आठवणी
आयुष्य हे असेच असते,एका होडीसारखे
पाण्यात वाहत असता,समजते एकसारखे
आठवणींच्या किनाऱ्याला केव्हाच होते सोडले दूरवर
आशा आहे मनात ,पुन्हा बालपणात बुडावे खोलवर
माहीत नाही केव्हा बालपणात बुडता येईल का ?
आयुष्याच्या अनमोल आठवणींचा दिप कधी जळेल का ?
पण एक गोष्ट नक्की
ती बसली माझ्या मनात पक्की
जेव्हा येईल उजाळा आठवाणींना
खरच सांगतो तेव्हा मात्रा नसेल भावनांना
वर्षे इतकी उलटून गेली
आयुष्याच्या या प्रावासाला मी जवळून पाहीली
तरी सांगतो गोष्ट एक
आयुष्याच्या अनमोल आठवणीत बुडतात अनेक
इच्छा मलाही आहे बुडावे मी ही
या आठवणीस उजाळा देण्या कमी पडे सुर्यही
तरी आभार मानेन मी त्या 'मित्राचे'
जो देतो संधी पुन्हा बालपणात रमण्याचे
म्हणून तर म्हातारपण येते सर्वांना
याच आयुष्यात जगताना विसरतो तो इतरांना
यालाच म्हणतात जगणे बालपणीचे
जे असते सर्वांच्या आवडीचे
जगावे मी ही इच्छा माझीही आहे
नका चिंता करु, माझा मित्र सर्वकाही पाहे
अजूनही आयुष्याच्या आठवणीत मला आहे रमायचे
त्याच्याशिवाय या संपूर्ण विश्वात नाही मला गमायचे
