STORYMIRROR

Nisha Kale

Abstract Romance

3  

Nisha Kale

Abstract Romance

आठवण

आठवण

1 min
441

अंतराने फक्त दूर जातेस

आठवणीचे रावे देऊन

मला सोबत नेतेस तुझ्या

स्वतःला माझ्यात ठेवून


बोटांवर निसटतासा स्पर्श देऊन

ओठांवर सोबतीची गाणी ठेवून

ओंजळ माझी प्रेमानी भरतेस

मनाच्या गाभाऱ्यात आठवणी तेवून


श्वासात माझ्या दरवळ देऊन

सर्वांगावर तुझा स्पर्श ठेवून

सतत माझ्यात जाणवत असतेस

नजरेला असीम स्वप्न देऊन


खूप साऱ्या आठवणींनी

डोळे जेव्हा पाणावतात

तू पुन्हा पुन्हा मला जाणवतेस

माझ्यात माझीच होऊन


©® निशा काळे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract