STORYMIRROR

vishal lonari

Inspirational

2  

vishal lonari

Inspirational

आठवण क्षण

आठवण क्षण

1 min
3.1K


लाटांच्या पल्याड खळखळणारा

गाजेहुनही आर्त नादावणारा

बेधुंद तुफान सामावलेला

एक समुद्र तुझ्यात वाहतो आहे

डोळ्यात सहज आलेख दिसतो

जेव्हाही ते मीन नयन घेता तरलता

निमिषात होतात माझ्या डोळ्यात

तुला आठवतानाचा पहिला क्षण

 एवढी नशा वाहतेय डोहात

की जाणारच खोल तुझी बुबुळे

काळेभोरपण त्यांचे मज पुकारते

कुणावरचं प्रेम अंतरी दडलेली

मुक्याने सांगून जातात बुबळे

जेव्हा तरलतेवर तू भरते सुरांना

तल्लीन होऊन जातो त्यांना ऐकत

तुला आठवतानाचा दुसरा क्षण

नाव-आडनाव तुझं काहीही असो

स्वभाव तुझा मात्र भलता जीवघेणा

यात सामील तुझी जीवनीसुद्धा आहे

एखाद्या झाडाची डहाळी हसत असत

जेव्हाही तुझ्या ओठांकडे प्रस्थानावे

तरुच्या डहाळीला बसतो बिलगत

तुला आठतानाचा तिसरा क्षण

आता मजसी गमे ना चंद्र सूर्य तारे

हवे तुझेच सहारे समजून घे इशारे

तुच श्वास होणे हा योगायोग नाही

नियतीने आपल्या दुरावले जराही

गात्र गात्र वदवून उठतील यापुढे

असाही प्रेमी होता एका क्षितिजाचा

तिच्यावीन जगला अन मेलाही

तुला आठवताना अखेरचा क्षण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational