STORYMIRROR

Vinay Dandale

Romance

4.6  

Vinay Dandale

Romance

आठवांची भरती ,,

आठवांची भरती ,,

1 min
15K



आठवांची भरती ....



मातीखाली गाडल्या गेलेल्या ,

एकजीव होऊन विरून गेलेल्या ,,,,

तरी पण

उमाळ्यातून प्रकटणाऱ्या

हुंदक्यावर स्वार होऊन येणाऱ्या

आठवणींचा कल्लोळ

पुसल्या गेलेल्या पाऊलखुणांना

पुनर्जीवित करतो ....

मग मात्र

मनाच्या अंगणी पडतो

बकुळीचा ताजा सडा

अन

पापण्यांच्या काठावर

आठवांची भरती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance