STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

आटापिटा

आटापिटा

1 min
267

रोज सकाळी उठून

चालतसे धावाधाव

वेळ काळ भान नसे

सुरू होई कावकाव।।


नसे उसंत थोडीही

खटाटोप रात्रंदिस

क्षणोक्षणी मनोमनी

विचारांची धुसफूस।।


रोज घराच्या बाहेर

पडा नित्य नियमाने

वीतभर पोटासाठी

रात्र दिवस धावणे।।


दानापाणी मिळवाया

सारी धडपड चाले

त्यात आयुष्याचे सारे

दिस निघून चालले।।


सुख मिळवण्यासाठी

चालतसे आटापिटा

सुखा ऐवजी जीवनी

दुःख येते बारा वाटा।।


सुखामागे धावतांना

सुख दूर दूर जाते

आटापिटा करूनही

आयुष्यात दुःख येते।।


आटापिटा सोडोनिया

सुख समजून घ्यावे

दुःख जरी आले त्याला

प्रभू प्रसाद मानावे।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational