आत्मा तर नाही ना..!
आत्मा तर नाही ना..!
मनी वाटलं मस्तपैकी
सुंदरशी कविता लिहावं...!
क्षणार्धात वाटलं
आपण काही कवी-गिवी नाही
पूर्वज कवी नाही
मग् काव्य स्फुरण्याचंओघ
कंठातून कसा येणार...?
निदान स्वप्न बघूया का?
स्वप्नात कविता लिहिता येईल
कविपणा मिरवता येईल...!
मनी विचाराचे वादळ उठले
सुसाट वेगाने धावत सुटले
मग वादळ एकवटले...!
कल्पनेच्या भाव-विश्वात बुडालो
सकारात्मक विचारात गर्क झालो
कधीतरी ऐकलं होतं
मोठे स्वप्न पहा...!
कालांतरे मनातील कल्पनेला
उच्चतम त्याहुनी अधिक
ध्येयाला आकार मिळतं
एकेदिवशी सहज अचानक
मनी स्फुरले शीर्षक व काव्य
लगेच घेतला कागज अन् पेन🌺
शब्दांवर शब्द सुचत गेले
भराभरा लिहीत गेलो
शब्दांच्या प्रवाहात वाहत गेलो
शब्द प्रवाहांती मनी कोडं उठलं
तो आहे तरी कोण...?
कंठाच्यातून सुचवीत असे शब्द
चल घाई कर,कर शब्दबद्ध
अन्यता विसरशील शब्द
अन् मग स्वप्न अर्ध...!
माला प्रेरित करणारा
तो अविनाशी परमात्मा अंश
आत्मा तर नाही ना...!!!
