आता तरी ये
आता तरी ये
आता तरी ये तू सखे
उगाच देऊ असा त्रास नको
हृदयाला लख्ख चकाकणाऱ्या
ग्रहण देऊ खग्रास नको || 0 ||
वाढत जातोय त्रास आता
किती आता सहन करू
मनात उठणाऱ्या भावनांना
किती आता दहन करू
फेरे तुझे करतोय किती
करू प्रेमाचा ह्रास नको
हृदयाला लख्ख चकाकणाऱ्या
ग्रहण देऊ खग्रास नको || 1 ||