आता सहन होईना...
आता सहन होईना...
नाही झाले आई तर
कल्पना ही करवेना
हवी आतली चाहूल
आता धीर धरवेना
झेलू कितीक वादळे
अन् करू ही साधना
जन्म सार्थ होण्यासाठी
किती साहू ह्या वेदना
किती केले मी प्रयत्न
थेंब उदरी धरीना
मासा मागे मास जाती
का हा प्रवाह वाहिना
डाग ओसाड पणाचा
कसा माथीचा जाईना
अपूर्णत्व का नशीबी
आता सहन होईना
उर फुटेल वाटते
देवा पाझर फुटेना
आस कोवळ्या जीवाची
हाय पान्हा पाझरेना
