आता फक्त स्वर्ग पाहायचे राहिले
आता फक्त स्वर्ग पाहायचे राहिले
सगळे हॉस्पिटल भरले
काही डॉक्टर संपले
काहीच नाही उरले
आता फक्त स्वर्ग पाहायचे राहिले
सर्व देऊळ बंद केले
सर्वांंनी मास्क घातले
तरीही काही नाही झाले
आता फक्त स्वर्ग पाहायचे राहिले
परत एकदा लॉकडाऊन लागले
ज्याचं "हातावर पोट" आहे त्याचें हाल झाले
अजून काही नाही उरले
आता फक्त स्वर्ग पाहायचे राहिले
