आता हळूहळू
आता हळूहळू
आता हळूहळू सावरते मी
रूळलेले केस आवरते मी
कळे ना कधी सुटली मिठी
हसू उमटले अलगद ओठी
तूझ्या डोळ्यातला भाव आगळा
माहोल जाणवे मला वेगळा
पाहूनी एकांत हा भारावलास तू
ओढूनी कवेत मज विरघळलास तू
श्वास श्वासात होई एकरूप
नवलाईचे ते नवे स्वरुप
भान हरपून विसरावे सारे
बेधुंद व्हावे प्रेमात खरे

