आता चहा म्हणजे चहा नसतो!!!
आता चहा म्हणजे चहा नसतो!!!
आता चहा म्हणजे चहा नसतो..
गरम पाण्यात डीप डीप असत..
साखरेचा त्यात पत्ता नसतो...
दुधाचापण थांग पत्ता नसतो...
तबेतीसाठी बर म्हणत...
नाक मुरडत..
हातभर ग्लासात प्यावा लागतो...
तर्हे तर्हेचे...
नाव असलेला चहा असतो...
नावाप्रमाणे त्यात खर काही नसत...
त्या वासाचे दोन थेंब टाकत...
जाहिरातींच सोंग असत...
सामान्यंच शोषण असत...
आता चहा म्हणजे चहा नसतो...
टक्कर द्यायला घायला सोबत कोणी नसत!
डिजिटल पडद्यावर कप दाखवत...
मित्रांनसोबत खोट खोट हसायच असत...
चाय पर चर्चा करत...
बळ बळ..
वाटेल त्या विषयावर...
नको नकोसे...
मत मांडायच असत...
अथितांच स्वागत करायला...
आता घरोघरी चहा नसतो...
शितपेयाचे ग्लास समोर करत...
बळ बळ हसायच असते...
वहिनी तुमच्या हातचा...
चहा हवा करायला...
कोणी मित्रत्वाच समोर नसते...
आता चहा म्हणजे चहा नसतो!!!
