STORYMIRROR

Kanchan Thorat

Tragedy Classics

3  

Kanchan Thorat

Tragedy Classics

आत माझ्या..!

आत माझ्या..!

1 min
238

कळलेच नाही कधी, कशी,

गाफील राहिले मी,

आयुष्याच्या वळणावर,

एकटीच पडले मी.


चिल्या पिल्ल्यांची,

चिवचिव सारी,

माझ्याच का,

कानी पडते?


चिमणा माझा भुर्रर्र उडाला;

दुसरीच्या हाकेसरशी.

मी बिचारी वाट पाहते,

चिमण्या ला साद घालते.


पिल्लांना जवळी घेऊन,

जमेल तितुके, घास भरविते.

अवचित येणाऱ्या, वादळांची;

 मनामध्ये, भिस्त वाटते.


वाटते मी वाघीण जरी;

आत माझ्या एक,

चिमणी राहते..,

आत माझ्या एक 

चिमणी राहते..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy