STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

आशेवर

आशेवर

1 min
20

त्या कठोर मनाच्या तळाशी ,

लपलेली अदृश्य मुलगी ,

डोकावु पाहते कधी अशी ,

जेव्हा गोष्ट घडते प्रेमाची ...

ती दिलखुलास हसते ,

तो प्रयत्न करतो थांबण्याचा,

पापण्यात भरून येते ,

त्याचा प्रयत्न आड बांधण्याचा ...

तिलाही मनसोक्त जगायचे असते,

प्रेम भरभरून करायचे असते ,

चुकल्यावर रडायचे असते ,

हसुन थांबायचे असते ...

पण तो तिला मनाच्या तळशीच ठेवतो ,

तिच काही काही ऐकत नाही ,

पुरुषाने रडायचे नसते ,

थकायचे नसते बाळकडूच तो पितो ...

ती मात्र त्याच्यात जन्म घेऊन,

कधीच लोप पावते तरी,

काही खाणाखुणा ठेवते ,

कधीतरी ती पुन्हा नव्याने जन्मेन ,

या आशेवर ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract