STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

आश्चर्य घडते

आश्चर्य घडते

1 min
127

काही वेळेस असे घडते ,

जे डोळ्यांसमोरून तरळुन जाते,

ते ओठावर येते ,

आणि आश्चर्य जे बोलले तेच घडते...

भ्रमाचा खेळ सारा खेळते,

दृष्टीतही अदृश्य क्षण भरते,

क्षणापुर्वी हे घडले असे वाटते,

सत्य की भुल मन विचारात पडते...

मनासारखे घडले तरी संशय जागते,

जे मला वाटते तेच कसे घडते,

नियती कोणता डाव रचते,

जो मला ना कळला हीच सल सलते...

जे विसरले ते आठवते,

भुत वर्तमानचा आव आणते,

सार जग मायाजाळ हेच खरे म्हणते,

घडणारी जादू क्षणभराची सोबती असते...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract