आस
आस
जगाचा रणधुमाळी मध्ये जगत असतांना,
आयुष्याची वाट शोधत असतांना,
प्रितीची आस मोढत असतांना ,
बंधनाची गाट सोडत असतांना ,
जीवनाची मला जाणीव झाली !१!
कधी तुटत कधी फुटत क्षण तो आठवावे
फक्त एकच ध्येय मनाला भासावे,
आयुष्याच्या ब्लॅक ॲण्ड व्हाइट फोटो मध्ये सप्तरंग कसे भरावे ,
असेच ते विचार क्षणोक्षणी आठवावे !!२!!
हृदयाला पायाखाली तुडवुन-तुडवुन फक्त एकच गोष्ट समजवावे..
आपल्या आयुष्यामध्ये मध्ये असं काहीतरी घडवावे
त्यात माझा आयुष्य नाहीतर नाही माझ्या पूर्ण परिवाराचे
आयुष्य तरी सुवर्णशील घड़ावे .!!!३!!!
