अर्थ तुच आहेस आई.
अर्थ तुच आहेस आई.
आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मुळेच आहे आई
माझ्या शानो शौकत, दरारा - रुबाबाचा अर्थ तुच आहेस आई.!१!
तुझ्यावर काय बोलु या एका दिवसासाठी
मृत्युचे अथांग मार्ग आहेत...
पण या विश्वात जन्म घेण्याचा एकमेव मार्ग आहेस तुच आई...
आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मुळेच आहे आई.!!२!!
या सृष्टीच्या निर्मिती पासून आज पर्यंत...
धरती - आकाशाला ही लाजवेल अशी अथांग प्रेमाची मुरत आहेस तुच आई...
आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मुळेच आहे आई...
कवी पृथ्वीराज शेवटी पुन्हा सांगुणी जाई आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्याचमुळे आहे आई.
माझ्या शानो शौकत, दरारा - रुबाबाचा,
अर्थ तुच आहेस आई - तुच आहेस आई...
