STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

आस...!

आस...!

1 min
562


आस...!


संध्याकाळी घरी जाताना

जरा जड जड वाटले

म्हंटल ओझं वाहून

शरीर का हे थकले...?


की ओझ्याच ओझं

वाटून वाटून

का हे शरीर

माझे थकले...?


प्रकाश डोक्यात

काहीच पडला नाही

पण

मनात फरक मात्र

पडल्या वाचून

राहिला नाही

दीर्घ श्वास घेतला

आणि पाय पुढे टाकला


तशी खसकन

ती मारकी म्हैस

अंगावर आली

म्हणाली

कुठे उलथला होतात...?


इथे जीवात जीव

नकोसा झाला...!

म्हंटल मनात

अजून तरी इथे

आपल्या देशात

आपण टाकाऊ नाही...!


कोणाची का मुले असेनात

आपण वडीलधारी मंडळी

या देशात टिकाऊ आहोत...!

विकावू नक्कीच नाही...!

खूप आनंद झाला

म्हंटल सुनबाई

इतकं प्रेम कशाला..?


त्या पेक्षा

एक घोटभर

चहाच टाका ..!

मला बरं वाटेल

आणि तुलाही

बरं वाटेल

नाही का...?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational