आरसा
आरसा
आरसा सांगे मज जीवनाचे सत्य
नटून मी आधी आरश्या पुढे गेली
आरसा मजला मनाला जसे
तू तुझ रूप सुंदर केल तस
रुपापरी मन ही सुंदर कर
तेव्हा जग ही तुझा हेवा करल...
कर स्वीकार एक नवा सत्यातला बदल....||ध्रु||
आरसा सांगे मज जीवनाचे सत्य
नंतर मी हीलची चप्पल घालून आरश्या पुढे गेली
आरसा मजला मनाला जशी
शरीराची उंची वाढाला हीलची चप्पल केली तयार
तसेच उंची समान विचार सुद्धा श्रेष्ठ करशिल
तेव्हा जग ही तुझा हेवा करेल...
कर स्वीकार एक नवा सत्यातला बदल....||१||
आरसा सांगे मज जीवनाचे सत्य
आरसाच असा खरा मित्र आपल्या जीवनातला
जेव्हा जेव्हा आपण रडलो तो न
कधी हसला आपल्या वरी,
या खोटारड्या जगात एकच खरा
मित्र आहे आरशा परी
तेव्हा आरसा बनव असा
चेहरा खोटा नहीं तर खरा दिसो
तेव्हा जग ही तुझा हेवा करेल...
कर स्वीकार एक नवा सत्यातला बदल....||२||
