STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आँनलाईन शाळा

आँनलाईन शाळा

1 min
161

आई माझी शाळा खरं

आहे खूप खूप छान

कधी गं सुरु होणार?

मला सांग सांग सांग   (१)


काका न्यायचे आम्हांला

रोज सकाळी गाडीने

मित्रांसवे मजा असे

दंगा नि मौजमस्तीने    (२)


छान गाणी गप्पागोष्टी 

रोज सांगायच्या बाई

अभ्यासाला मित्रांसवे

खूप खूप मजा येई    (३)


मित्रांसवे मी शाळेत

बरोबर जेवायचो

रोज डबा सारेजण

गप्पा मारत खायचो    (४)


मला नको मोबाईल

नको गं घरुन शाळा

नाही कुणी टाळी देत

नाही सवे मित्रमेळा    (५)


आता प्रार्थना देवाला

लस सर्वांना मिळावी

शाळा माझी उघडावी

अभ्यासाला मजा यावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract