Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Neeraj Shelke

Abstract

4  

Neeraj Shelke

Abstract

आणि काय हवंय?

आणि काय हवंय?

1 min
260

आयुष्याच्या या वळणावर आय सी यु मध्ये पडल्या पडल्या

अगदी शेवटच्या क्षणाला सगळं काही मिळालंय असं वाटतंय,

तरीही मनाला आतून वाटतं की अजून काहीतरी हवंय पण कळतच नाहीये की आणि काय हवंय? 

कुणालाच मिळाले नसतील असे आई वडील मिळाले, 

त्यांनी उत्तमोत्तम संस्कार केले, भाऊ बहीण मिळाले, 

समजून घेणारा, गरजेला उपयोगी पडणारा, जीवाला जीव देणारा असा मित्र परिवार मिळाला, तरीही मनाला आतून वाटतं की अजून काहीतरी हवंय पण कळतच नाहीये की आणि काय हवंय? 

उच्च शिक्षण झालं, चांगल्या पगाराची नोकरीं मिळाली, 

सुशिक्षित, सुंदर, जीवापाड प्रेम करणारी बायको मिळाली, 

देवाच्या कृपेनें एक राजबिंडा मुलगा आणि गोंडस अशी मुलगी झाली,

तरीही मनाला आतून वाटतं की अजून काहीतरी हवंय पण कळतच नाहीये की आणि काय हवंय? 

दोन्हीही मुलांची व्यवस्थित लग्न लागलीत, दोघेही त्यांचा संसार उत्तमप्रकारे करत आहेत,

स्वतः करत असलेल्या लिखाणाला लिखाण क्षेत्रात मानाचं समजलं जाणारं पारितोषिकही मिळालं,

स्वतःची 50 एक पुस्तकं प्रकाशित झालीत,

तरीही मनाला आतून वाटतं की अजून काहीतरी हवंय पण कळतच नाहीये की आणि काय हवंय? 

हे देवा, आता तूच सांगशील का रे बाबा 

इतकं सगळं छान सुरळीत होऊनही 

या वेड्या मनाला आणि काय हवंय, आणि काय हवंय...?

Rate this content
Log in