STORYMIRROR

Anil Chandak

Romance

4  

Anil Chandak

Romance

आनंदाचा झरा

आनंदाचा झरा

1 min
573

असेच एके दिवशी, मी तिला पाहिले,

मनातल्या इच्छांना साकार करणारा,

आकार देणारा, क्षण गवसतांना पाहिले,

मला पाहून मोहक हसली ती,

नेत्र कटाक्षाने तिने,

माझ्या प्रेमास होकार दिला...


आजवर पकडू पाहत होतो,

मला कधी गवसला नाही,

पाठलाग करून दमलो,

तरी, सापडला नाही...


अभागी होतो मी, काय वर्णावे,

अभागी होती धाव,

क्षणभर काय दिसावे...।


तारकापुंजच डोळ्यापुढे आले,

मतीच गुंग झाली माझी,

माझ्या डोळ्यात नाचत होत्या,

त्या काळेभोर बाहुल्या..

त्यातुन सुटलेला तीर,

गेला माझे ह्रदय भेदून..

भेदून मला, माझ्या सर्वसाक्षी बुध्दीला,

मला काहीच कळेनासे झाले.


मला मी प्रेमात पडल्याचा,

नवा शोधच लागला,

अंधाला नेत्र मिळावेत,

भुखेलेल्यांना अन्न,

सुखाचा साठाच,

गवसला मजला,

अक्षय आनंदाचा झराच,

गावला होता मला....


हासत होते सारे,

हासत होती दुनिया,

वेडाचार पाहुन माझा..


मी ही त्यांच्यावर हसलो,

होती त्यांच्या हसण्यात जलनता,

अन माझ्या, शितलता...


जे मिळत नाही कत्तलेआम करून,

जे मिळत नाही,

धनाच्या राशी रचून...


जे मिळत नाही,

जबरदस्ती करून..

ते मिळवले मी,

फक्त मोहक हसून...


प्रेमाची लागण झालेल्या,

व्यक्तीला,

जग जरी वेडा मानो,

पण प्रेम फक्त,भाग्यवंताच्या,

नशिबात येते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance