STORYMIRROR

Sanjay Jadhav

Romance

3  

Sanjay Jadhav

Romance

रंग

रंग

1 min
241

रंगात मी न्हाहले 

गन्धात मी भिजले 

कधी कुठला रंग मिसळला 

कळले नाही मला श्रीरंगा 


चित्रात मी भरले रंग 

जीवन माझे रंगून गेले 

स्वत:चे अस्तिव विसरले 

एकरूप रंगाने झाले 


रंग गंध सोबत घेऊन 

नवी चौकट मी मांडते 

जगाचे माझ्या चित्र मी 

मनात मी साकारते 


आकार देते जीवनाला 

काळजी मी घेते इतरांची 

स्वतःच देते रंग मनाला 

स्वभाव पेटी रंगांची 


पाण्यासारखे मी रंगून 

माझे अस्तिव विसरते 

जेथे जाते तेथे मात्र 

रंगात रंगून मी जाते 


सारे चित्र माझ्या मनीचे 

शब्दात मी मांडते 

अलगूज साऱ्या अंतरीचे 

रंगात रंगून मी जाते 


रंग प्रेमाचा गहिरा कसा 

मी रंगून पार करते 

सात रंग जीवनी जसा 

रंगात रंगून मी जाते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance