STORYMIRROR

Neeraj Shelke

Romance

3  

Neeraj Shelke

Romance

ही गुलाबी हवा

ही गुलाबी हवा

1 min
191

श्वास श्वासात मिसळता 

रोग होई रे नवा, 

प्रेम असते नाव त्याचे 

पसरते गुलाबी हवा !!


एकमेकासाठीच फक्त 

हृदय हे धडकते, 

प्रेमी जीव एकमेकांत 

हळुवारपणे अडकते !!


भान नसते जगाचे अन्

कळत नसते काही कुणा, 

एक वेळ येते अशी 

वाटते हे प्रेम की यातना !!


घेतलेल्या शपताना मग 

जागती नाही कुणी, 

प्रेम होते तयांचे की 

स्वप्ने होती ती जुनी !!


साथ देणारे तयांची 

साथ सोडू लागतात, 

रोज रोज मग सखयाशीही

अनोळखीगत वागतात !!


जाते विरून एकदाची 

मग ती गुलाबी हवा, 

श्वास श्वासात अडकता पुन्हा 

रोग होई तोच नवा !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance