प्रेम ऋतू
प्रेम ऋतू
तुझे माझे नाते असे,
बेधुंद प्रीत मस्तीतली...
आठवते कां रे तुला आपले,
रम्य त्या गोष्टी भेटीतली...
आले ऋतू गेले ऋतू,
पण प्रीत तिथेच राहिली...
राहून इथे मी तर तू तिथे,
वाट प्रेम ऋतुची पाहिली...
ती सायंकाळी भेट नदीकाठी,
तुझीआणि माझी प्रीत खरी...
जनु सूर्य प्रकाश सोनेरी,
तरंग लहरी पाण्यावरी...
आठवते का हात हातात घेऊनी,
दिली होती तू मला वचने...
ऐकुनी धन्य धन्य मी जाहले,
होती पाहिली मी खूप स्वप्ने...
प्रेम ऋतू येताच मनी,
भेटी माझा साजण येईल...
हृदयी प्रेम खूप घेऊनी,
मला मिठीत घेईल...

