STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

3  

Bharati Sawant

Romance

सावळबाधा

सावळबाधा

1 min
235

फुलले प्रेम राधा-कृष्णाचे 

झाली राधास सावळबाधा

गोकुळीच्या कन्हैय्यासाठी

झुरतसे वृंदावनीची राधा


रासलीला मिळूनीच रचल्या

मटकी फोडतो द्वाड कान्हा 

अल्लड खोड्यांनी त्रस्त होई

यशोदेचा लाडका हा तान्हा


गोरी प्रियतमा राधा गवळण 

सावळा प्रेमी हा मुरलीवाला

खेळतसे गोपीकांसवे रंगांनी 

नाचतेय स्वच्छंद ब्रीजबाला 


यमुनेतीरी दंगला खेळात तो 

रंगपंचमीचा सण पहा आला

गोपिकांवरी टाकूनीच गुलाल

लपूनी बसतो असा गोशाला


घेऊनी माठ दुधाचे डोईवरी

गवळणी जातसे बाजाराला 

सूर बासुरीचे छेडीत रानात

तृप्त होतसे कानही सुराला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance