प्रेम
प्रेम
सारखा होतोय मला तुझाच भास
माझ्यासाठी तू आहेस खूप खास
तुला ही आठवतंय का सगळं
आपलं नातं होतं ना किती वेगळं
सारखं आपलं एकमेकांना चोरुन बघणं
अन् सगळ्यांचं ते आपल्याला चिडवणं
सतत आपलं दिवसरात्र बोलत बसणं
अन् नकळत एकमेकांत गुंतत जाणं
आठवताच सारं भरून येतंय मन
किती सुंदर होते ना रे ते क्षण
आठवतेय रे तुझी ती प्रेमळ साथ
अन् तुझ्या हातातला तो माझा हात

