STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Romance Others

3  

Bhagyashri Chavan Patil

Romance Others

जीवनात एक व्यक्ती अशी असावी

जीवनात एक व्यक्ती अशी असावी

1 min
723

जीवनात कोणी तरी एक व्यक्ती असावी

ज्याला तुम्ही न काही सांगता सगळं उमजावं..

जीवनातल्या तुमच्या काही गोष्टीतील गुपित त्याने हळुवार समजावं..

तुमच्या मनातल्या भावनाना त्याने पाझर घालावं..


जीवनात एक तरी व्यक्ती अशी असावी..!!


जीवनातल्या अवघड वळणावर त्याने सोबत असावं

जीवनाचं सुखाच ठिकाण त्याने बनून राहावं..

तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्याच कारण ही त्याने असावं..

तुमच्या प्रेमाचा समुद्र त्याच्यासाठी राखून ठेवावं..


जीवनात एक तरी व्यक्ती अशी असावी..!!


प्रेमात सोबत राहण्याच्या आणाभाका नसावं

दूर असलो तरी त्याला आपलं मन कळावं..

प्रभु श्रीराम आणि माता सीता सारखं अतूट नातं त्यांचं असावं

वृदावन मधल्या राधा कृष्णा सारखं निखळ प्रेम असावं..


जीवनात एक तरी व्यक्ती अशी असावी..!!


त्याने थोड हसावं त्याने थोड रुसाव

थोडस भांडाव आणि मन नंतर त्यानेच मानवावं..

त्याच्या त्या खोल डोळ्यात थोडंसं हरवून जावं

त्याच्या मधुर वाणीत थोडंसं रमावं..


जीवनात एक तरी अशी व्यक्ती असावी..!!


माझ्या ही नशिबात कोणी तरी अस यावं

ज्याच्या हृदयाच्या ठोक्यात जणू मीच असावं..

माझ्या आयुष्यभर साथ देत त्याने फक्त राहावं..

गोड अशा स्वप्नात त्याने मला येऊन भेटाव..

 

जीवनात एक तरी व्यक्ती अशी असावी..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance