प्रेयसी
प्रेयसी
सुंदर रूपवान
सुवर्ण हरिणी समान
बोलके नयन
प्रेयसीचे
भावनांना जाणणारी
हळुवारपणे नाते जपणारी
आपली वाटणारी
सखी
लगेच रागवणारी
पण थोडी भावूक
चाल नाजूक
डौलदार
प्रेमाच्या गोष्टी
ऐकुनी व्हावे थक्क
लडिवाळ हक्क
दाखवत
थोडी हट्टी
समजूतदार तेवढी असावी
गट्टी जमावी
कायमची
कोणतेही वादळ
लोटणार नाही दूर
झाली कुरबुर
जरी
दयावी साथ
घेऊनि हाती हात
गाणी गात
आयुष्यभर
स्वप्नातही तिने
हळूच बोलावे येऊनि
आणाभाका घेऊनि
प्रेमाच्या
मी नसताना
आठवण तिला सतवावी
प्रेमज्योत ठेवावी
मनात

