आनंद
आनंद
आनंद झाला माझ्या मनाला
मनाचा दिस आज उगवला
अन् स्वानंदे रमू लागला
भावनांचा साठा झाला!
मनाला ध्यास लागला
काव्य ऋतु फुलु लागला
परतावा त्याचा मिळाला
अन् समाज बघू लागला!
मन मयूर नाचू लागला
काव्य बागेस बहर आला
फुलांचा सुगंध दरवळला
मनाचा दिस आज उगवला!
