आंबा
आंबा
फळांचा राजा म्हणून सर्वत्र मान
चवीमध्ये ही मिळते नेहमीच अव्वल स्थान
कच्च्या आंब्याचा तर नखरा भारी
बघताच तोंडाला सुटते पाणी
लोणचे रूपात आढळून येते घरोघरी
कोकणच्या हापूस आंब्याची तर
लज्जत ही न्यारी
पशू पक्षी ही त्याचे गुणगान गाती
आंब्याचे विविध प्रकार
तरी हापूस हा जगात भारी
सातासमुद्रापार जाऊन हा
आपल्या गोडीने ओलांडतो किनारा
पिढ्यानपिढ्या राहून आमराईत
सावली म्हणून पक्षांना देतो निवारा
खाऊनी आंबा रुजवा कोय जमिनीत
निसर्गाचाही समजा हाच आदेश
आंबा आपल्याला देत असतो
नेहमी हा एक अनमोल संदेश....
